#BacterialInfection #BhandupBMCHospitalChildDeaths #MaharashtraTimes
रुग्णालयातून पालकांना अचानक फोन आला आणि काहीच मिनिटात त्यांनी आपलं बाळ गमावलं. महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संपूर्ण चित्रच पालटल. पालकांचा संताप,आक्रोष अनावर झाला. रुग्णालायच्या निष्काळजीपणाने आपलं बाळ गेल्याच्या वेदना पालकांनी मांडल्या. रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुला पटेल यांनी पीडित पालकांसमोर वादग्रस्त विधान केलं होत. त्यामुळे, पालक संतप्त झाले असून त्यांनी रुग्णालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला.