एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी जरी परिवहन मंत्र्यांसोबत उभं राहत संप मिटल्याची घोषणा केली असली; तरी परिस्थितीत अजूनही काहीही फरक पडलेला नाही, अशी स्पष्ट कबूली एसटी महामंडळांच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे. बुधवारच्या सुनावणीत एसटी कामगार संपावर नाहीत याचा कामगारांच्यावतीनं हायकोर्टात पुर्नउच्चार करण्यात आला. हायकोर्टानं पुढीस सुनावणी 5 जानेवारीपर्यंत ही सुनावणी तहकूब केली.