विधानसभा हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवशी गोंधळ पाहायला मिळाला. भास्कर जाधव यांचं वर्तन आक्षेपार्ह आणि लज्जास्पद होतं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अशी वर्तवणूक सहन केली जाणार नाही. संपूर्ण सभागृहाची मागणी होती. मात्र सभागृहाच्या दबावाखाली त्यांनी माफी मागितली. या वर्तनाचा मी निषेध करतो. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतयं की ते अजूनही या गोष्टीचं समर्थन करतायतं असं यावेळी फडणवीस म्हणाले.