Modified jeep using scrap | दत्तात्रयवर आनंद महिंद्रा फिदा म्हणाले, बोलेरो गाडी देईन....|Sakal Media

Sakal 2021-12-22

Views 141

Modified jeep using scrap | दत्तात्रयवर आनंद महिंद्रा फिदा म्हणाले, बोलेरो गाडी देईन....|Sakal Media
देवराष्ट्रे, (सांगली): देवराष्ट्रे हे खरेतर देशाचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थान. हेच देवराष्ट्रे आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते वेगळया कारणाने आणि कारनाम्याने. हा कारनामा केला आहे. दत्तात्रय लोहार यांनी. त्यांच्या मुलगीने चारचाकी गाडी घेण्याची मागणी केली. आपल्या मुलगीच्या हट्टाखातर त्यांनी मग डोक लढवल आणि कारनामा केला. त्यांनी चक्क मिनी जिप्सी बनवून आपल्या मुलीला अनोखी गिफ्टच दिलीय. त्यांच्या या कारनाम्याची चर्चा सोशल मीडियावरही आता सुरू आहे. त्यात नेहमी चांगल्या व सकारात्मक गोष्टींना सातत्याने पाठिंबा आणि आपल्या सहह्दयतेने कित्येकांची मनं जिंकणाऱ्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असणाऱ्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही दखल घेतली आहे. या कारागिराने बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शनास ठेवीन, असे ट्विट करत एकप्रकारे दत्तात्रय लोहार यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली आहे.
#Sangli #AnandMahindra #DattatrayaLohar #SocialMedia #Viral #fourwheeler #MaharashtraMan

Share This Video


Download

  
Report form