विधानसभा अधिवेशनात आज पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विधानसभेत एकच घोषणाबाजी सुरु झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं, अशी मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य मी मागे घेतो, तसेच माझे अंगविक्षेपही मागे घेतो, असे ते म्हणाले.