#StWorkers #StStrike #MaharashtraTimes
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातुन अजय गुजर यांनी माघार घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. तर दुसरीकडे आता प्रशासनाकडून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातील पाणी बंद करण्यात आल्याचे आज सकाळी पाहायला मिळाले.