#CromeNews #Murder #AccusedFugitive #MaharashtraTimes
कौटुंबिक वादातून तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला आरोपींना बेड्या ठोकल्या असून दोन मुख्य आरोपी फरार आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आनंद श्रीहरी तेलगू उर्फ शेट्टी असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे