#JayaBachchan #RajyaSabha #Parliament #MaharashtraTimes
एकीकडे ऐश्वर्या रायची ईडीकडून चौकशी होतेय. तर दुसरीकडे, ऐश्वर्याची सासू म्हणजे अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या राज्यसभेत आक्रमक झालेल्या दिसून आल्या. यावेळी सत्ताधारी नेते आणि जया बच्चान यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. 'तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होतील', असा शाप जया बच्चन यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या १२ खासदारांच्या निलंबनावरून त्या बोलत होत्या. या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज ५ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. शिवाय पनामा पेपर्स लीकचे हे जागतिक प्रकरण उघडकीस आल्यावर ईडीकडून २०१६ पासून तपास सुरू आहे.