राज्यात नगरपंचायत निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्ष जोमाने प्रचारात गुंतलेले आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी 'तुम्ही ३२ नंबरच्या खात्याचे मंत्री' असं म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. केजमधील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी या टीकेला चोख प्रतिउत्तर दिलंय. सामाजिक न्याय विभागाला नाव ठेवून तुम्ही बाबासाहेबांचा अपमान केला आहे, असं धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय.