जालना शहरातील औरंगाबाद रोडवरील बारवाले कॉलेजच्या येथे खळबळ माजली आहे. चंदनझीरा भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. युवकाच्या डोक्यात जबर वार करून खून केल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. तौफीक खान असं मयत तरुणाचे नाव आहे. जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेण्यात येत नाही तोपर्यंत मयताला घेऊन जाणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला. जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांनी देखील घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. खून नेमका का झाला?, कोणत्या कारणासाठी झाला? पूर्व वैमनस्य होतं की आणखी काही दुसरं कारण आहे, याबद्दलचा सविस्तर तपास जालना पोलिस करत आहेत.