#Leopard #UnnathiGardens #ForestDepartment #MaharashtraTimes
ठाण्यातील देवदयानगर येथील उन्नती गार्डन परिसरात पहाटेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकाच भीतीचे वातावरण पसरले आहे. उन्नती गार्डन परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या फिरत असताना कैद झाला आहे. येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळ असल्याने परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर पाहायला मिळतो. या बिबट्या बाबत वनविभागाला तक्रार देण्यात आली असून वनविभाग बिबट्याचा तपास करत आहेत.