#BalasahebThorat #Congress #AshokChavan #AghadiSarkar #MaharashtraTimes
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसची बाजू सांभाळत सर्व पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता कॉंग्रेसमध्ये असल्याचं म्हटलं आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या वक्तव्याचे बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केले आहे. 'राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे', असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना अशोक चव्हाण बरोबरचं बोलले, काँग्रेस आहे म्हणूनच सरकार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.