Petrol Diesel Rae : पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर;सोन्याच्या किंमतीत वाढ

TimesInternet 2021-12-16

Views 2

#PetrolDieselRate #GoldRate #GoldSilverRate #MaharashtraTimes
पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत.आज 42 व्या दिवशीही इंधन किंमतीत कोणतीही वाढ किंवा घट नाही.दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लीटर तर, डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे.मुंबईत पेट्रोलचा दर १०९.९८ रुपये प्रति लीटर तर, डिझेलचा दर ९४.१४ रुपये प्रति लीटर आहे.कोलकातामध्ये पेट्रोल चा दर104.67 रुपये प्रति लीटर तर, डिझेलचा दर 89.79 रुपये लीटर आहे.चेन्नई मध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रति लीटर तर, डिझेलचा दर 89.79 रुपये लीटर आहे.तर,सोन्याच्या किंमतीत आज क्वचित वाढ पाहायला मिळाली.सोन्याचा आजचा दर 47 हजार 520 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. काल एक तोळा सोन्याची विक्री 47 हजार 510 रुपयानं केली जात होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळं सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.देशात लग्नसराईचा हंगाम असल्यानं सोन्याची मागणी वाढत आहे. ज्यामुळं सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळू शकते. गुडरिटर्न वेबसाईटनुसार, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 529 रुपये आहेदिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 51 हजार 180 रुपये इतका आहे.चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS