#VitthalRukminiTemple #Decoration #Flowers #MaharashtraTimes
आज एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर सजले आहे.आकर्षक आशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराला अतिशय आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे,पुणे येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचूनदकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोलाखांबी येथे ही रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली.यासाठी झेंडू , अष्टर , कामिनी आणि शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. फुलांच्या या मनमोहक सजवटीमुळे विठ्ठल मंदिर खुलले आहे.