अभिनेत्री कंगना रनौत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी जावेद अख्तर यांच्याकडून करण्यात आली आहे.लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत यांच्याविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती.