#AnilParab #GopichandPadalkar #Strike #StEmployee #MaharashtraTimes
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी थेट टीका केली. पहिवहन मंत्री अनिल परबांनी आपलं अपयश झाकण्याकरीता, मी आणि सदाभाऊ, एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत.