#Record #Thef #Driver #Bike #MaharashtraTimes
रेल्वेच्या पार्किंगमध्ये ठेवलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना कल्याण पश्चिम मधील रेल्वेच्या पार्किंगमध्ये घडली.याप्रकरणी पार्किंग चालक महेश शिंदे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.अप्पू दत्ता यांनी आपली दुचाकी रेल्वेच्या अधिकृत पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती.रात्री कामावरून परतल्यानंतर ते नेहमीप्रमाणे आपली दुचाकी घेण्यासाठी पोहचले असता त्याठिकाणी दुचाकी नसल्याचे आढळून आले.पार्किंग चालक महेश शिंदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने टेबलवर असलेल्या रजिस्टर मधील गाडी नंबरवर खाडाखोड केली होती.याचा जाब विचारताच त्याने रजिस्टरचे खाडाखोड केलेले पानच फाडून टाकले.महेश शिंदे यानेच बाईक गायब केल्याचा संशय असल्याने रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.रेल्वे पोलिसांनी फसवणुकीसह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेश शिंदेला अटक केली.तसेच पोलिसांनी बाईकचा तपासही सुरु केला .आहे