बाबा साहेब आंबेडकरांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत झाला . त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात येतो .कारण त्यांच्या निधनापूर्वी म्हणजेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी त्यांच्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. महापरिनिर्वाण याचा शब्दशः अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण' असा होतो. त्यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप काम केले आणि अस्पृश्यता संपवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना बौद्ध गुरू मानले जाते. डॉ.आंबेडकरांना त्यांच्या कार्यामुळेच निर्वाण मिळाले असे ते मानतात. त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून मानली जाते.
#drambedkar #mahaprinirvan #babasahebambedkar #maharastra #sakal