हिंदुस्थानातील ४ लोकांमुळे बाबरी मशीद पाडण्यात यश आलं असून बाबरी पडल्याचा आम्हाला गर्व आहे असं विश्वहिंदु परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीणभाई तोगडिया यांनी म्हटलंय. तसेच, या लोकांना केंद्र सरकारने भारतरत्न द्यायला हवा अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. राम मंदिरच्या नावाने सत्ता मिळवली परंतु राम राज्य अद्यापही भारतात आलं नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.