एसटीच्या इतिहासात कधी मिळाली नसेल एवढी म्हणजे ४१ टक्के वाढ सरकारने दिली. यामुळे १० वर्षे ते ३० वर्षे सेवा करणार्या कर्मचार्यांना २४ हजार ते ५६ हजार रुपये वेतन मिळणार आहे. तसेच न्यायालयाच्या अधिन राहून नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा असे मी परत आवाहन करतो. एसटी ही प्रवाशांसाठी आहे. लाखो प्रवाशांचे या संपामुळे होणारे हाल यापुढे सहन केले जाणार नाहीत. संप मागे न घेतल्यास 'मेस्मा' लागू करण्यासह अनेक पर्याय आमच्याकडे आहेत- अनिल परब, परिवहन मंत्री