अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी सिनेमागृहातच फटाके फोडत आपला आनंद साजरा केला. अंतिम चित्रपटामध्ये सलमान फायटिंग करतानाचे दृष्य दिसत असताना त्याच्या चाहत्यांनी एका सिनेमागृहात फटाके फोडल्याचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ स्वतः सलमान खानने इंस्टाग्रामवर शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सलमान खानने सिनेमागृहांमध्ये अशा प्रकारे फटाके फोडण्याची गंभीर दखल घेत चाहत्यांना त्याचे किती जीवघेणे परिणाम होऊ शकतात याची कल्पना देत हे न करण्याचं आवाहन केलं.