बिगबॉस १५ मधील स्पर्धक डोनल बिष्ट हे पर्व सुरु झाल्यानंतर काही दिवसातच स्पर्धेतून बाहेर पडली. नुकतंच तिने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तिने बिगबॉसच्या घरातील अनुभव व्यक्त केला. बिगबॉसमधून बाहेर पडल्यावर मी खूप खुश आहे, असं तिने म्हटलंय. त्याचबरोबर तिला स्पर्धेतून बाहेर काढणं योग्य नव्हतं असं देखील तिने सांगितलं आहे.