मोदी सरकारने नवे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विरोधकांकडून म्हट्लं जातंय. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.