Myra Vaikul best child actor | 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' होण्यासाठी अशी केली होती मायराने गोड विनंती
#lokmatfilmy #myravaikul #myravaikulchildactor
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ ही प्रेक्षकांची लाडकी ठरलीये. आपल्या गोंडस अभिनयाने तिने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलयं. छोट्या पडद्यावर एन्ट्री करण्याआधी मायरा सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय होती. मात्र मालिकेत परीच्या भूमिकेत झळकू लागल्यानंतर तिला आणखीनच लोकप्रियता मिळू लागलीये. काही दिवसांपूर्वी झी मराठी अवॉर्ड सोहळा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचे अॅंकरिंक देखील मायराने केलं होतं. सोबतच मायराला या अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळलेलं. तसेच सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा मान देखील मायराने मिळवला होता. तिला हा पुरस्कार मिळावा यासाठी मायराने सर्वांना एका व्हिडीओतून विनंती देखील केली होती. आता हा व्हिडीओ शूट करतानाचा पडद्यामागचा म्हणजेच bts व्हिडीओ मायराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओत मायरा कॅमेरामॅन अॅक्शन म्हणाल्यावर तिला सांगितल्याप्रमाणे डायलॉग म्हणताना दिसून येतेय. (Snehal VO)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber