गेल्या दोन आठवड्यापासून अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवाहन करून देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध आगारामधून २ हजार ५३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या विविध आगारातील कर्मचारी आझाद मैदान येथे सहभागी झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने अनेकांनी आत्महत्येचं देखील पाऊल उचललं आहे. जर राज्य सरकार अजूनही लक्ष देत नसेल तर आम्ही फासावरही चढायला तयार आहोत असे या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
#STEmployees #Protest #mumbai #azadmaidan