राज्यातील एसटी कामगार पुन्हा संपावर गेले आहेत. बस बंद असल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रिक्षा,खाजगी बस चालक प्रवाशांकडून जास्तीचे गाडीभाडे आकारात आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तिकिटाचे जास्तीचे पैसे घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे.