सांगली जिल्ह्यातील चिंचाळे गावात चक्क म्हशींसाठी स्विमिंग पूल तयार करण्यात आला आहे. प्रगतशील शेतकरी माणिक गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला गायकवाड यांनी म्हशींसाठी मुक्तसंचार गोठा उभारला आहे. दोन एकर जागेमध्ये विकसित केलेल्या या गोठ्यात म्हशींना उन्हापासून संरक्षणासाठी शेड आणि पोहण्यासाठी स्विमिंग पूल बांधण्यात आला आहे. गायकवाड दांपत्याने विकसित केलेला हा मुक्त गोठा प्रयोग यशस्वी ठरत आहे.
#SwimmingPool #buffaloes #Sangli