#1971war #indiavspakistanwar #indiavspakistan #swarnimdivas
१९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने २०२१ हे स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. विजय गाथा सांगणारी स्वर्णिम विजय मशाल नाशिकच्या तोफखाना केंद्रात दाखल झाली आहे. लष्करी बँडच्या तालावर सलामी तसेच भारतीय सैन्यदलात परंपरागत वापरत असलेली उखळी तोफा तसेच १९७१ च्या युद्धात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या १२० मिलीमीटर मॉर्टन गन, ब्रिटिश काळापासून वापरत असलेली हवीतझर गन, कारगिल युद्धात ऐतिहासिक कामगिरी करणारी बोफोर्स तोफ, नुकतीच दाखल झालेली आधुनिक काळातील वज्र तोफ याशिवाय रॉकेट लाँचर या सर्व तोफांनी एकाचवेळी रेंजमधून समोर असलेल्या हरबरा लँड या ठिकाणी तोफा डागल्या व स्वर्णिम विजय मशालीला मानवंदना दिली.
(बातमी - अंबादास शिंदे)