बीड जिल्ह्यातील परळी शहरातून तब्बल १४० गाढवांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वीटभट्टीसह इतर कामांसाठी परळी शहरात गाढवांचा उपयोग केला जातो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून एक एक करत तब्बल १४० गाढवे चोरीला गेल्यामुळे त्यांच्या मालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या संदर्भात संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.