'आज बाळासाहेब असते तर...' क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र | Kranti Redkar's letter to CM Uddhav Thakeray
अभिनेत्री क्रांती रेडकर ही पती समीर वानखेडे यांच्या प्रकरणावरुन सध्या होत असलेल्या वैयक्तिक टीकेमुळे हैराण झालीये. अखेर तिनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत एक भावूक पत्र लिहीले आहे. ज्यामध्ये तिने एका महिला कलाकारावर अशा खालच्या पातळीची टिका करणं बाळासाहेबांनादेखील आवडलं नसतं असं म्हटलं आहे. तिने हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये तिने म्हटलय की, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये हे त्या दोघांनी शिकवलं…तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे…लढते आहे… सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत…(Chitrali VO)
#KrantiRedkar #UddhavThakeray #BalasahebThakeray
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber