काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी पीकविमा बद्दल केलेल्या आरोपांची आणि त्यावर अशोक चव्हाणांनी दिलेल्या उत्तराची व्हिडीओ क्लिप सचिन सावंतांनी पत्रकार परिषदेत लावली. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी खोटारडेपणा करून सोडून योग्य दिशेने काम करावे, असंही ते म्हणाले.