मुंबईच्या कांदिवली येथील पोईसर भाजीवाडी चाळीमध्ये रात्री ८ च्या सुमारास टीव्ही चालू असताना अचानक ब्लास्ट झाला. या ब्लास्टमुळे घरालाही आग लागली. या घटनेत घरात असलेली आई आणि तिचा लहान मुलगा थोडक्यात बचावले. ही एलईडी टीव्ही सॅमसंग कंपनीची होती. ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून आढावा घेतला.