Tulja Bhavani Temple | तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा | SakalMedia
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापुजा मंगळवारी (ता.१२) बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या नवरात्राच्या निमित्ताने देवीची वेगवेगळी रूपे बांधण्यात येतात. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापुजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली ही पुजा बांधण्यात आली होती. तुळजाभवानी मातेच्या मुख्य सिंहासनावर पुजा बांधण्यात आली होती. तुळजा भवानी मातेस सर्वोकृष्ट दागदागिने घालण्यात आले होते. (व्हिडिओ - जगदीश कुलकर्णी)
#Tuljapur #Osmanabad #Tuljabhavani #TuljaBhavaniTemple