उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महविकास आघाडीतील तीनही पक्षांनी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील विरोधी पक्षाकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी "राजकीय स्वार्थासाठी हा बंद लोकांवर लादला आहे", असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
#RamKadam #MaharashtraBandh #LakhimpurKheriViolence