लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. या बंदमध्ये सरकारमधील इतर सहकारी पक्षही सहभागी झाले आहेत. शिवसेना आणि काँग्रेसनंही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. आता मुंबई डबेवाला असोसिएशननेही या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.
#Maharashtrabandh #MumbaiDabbawala #LakhimpurKheriVoilence #Farmers #ThackerayGovernment