kolhapur Ambabai Mandir | 'श्री अंबाबाई'ची माहेश्वरी मातृका रूपात सालंकृत पूजा | Sakal Media
नवरात्रत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यंदाच्या उत्सवात सप्तमातृका या संकल्पनेवर श्री अंबाबाईच्या सालंकृत पूजा बांधल्या जात आहेत. आज दुसऱ्या दिवशी द्वितीय मातृका माहेश्वरी या रूपात पूजा बांधण्यात आली. ही भगवान शंकराची शक्ती आहे. ती नंदीवर आरूढ असून तिला चार हात आणि त्रिनेत्र आहेत. तिच्या हातात त्रिशूल, डमरू, माळा, वाडगा आहेत, अशी माहिती श्रीपूजक अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सकृत मुनीश्वर यांनी दिली. ( व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#kolhapur #AmbabaiTemple #AmbabaiTemplekolhapur #Mahalaxmitemplekolhapur #mahalaxmitemplekolhapurlive #mahalaxmitemplekolhapurmarathi #ShreeMahalaxmiAmbabaiTempleKolhapur #SakalMedia