राज्य सरकारने केलेल्या घोषणेनंतर राज्यातील मंदिर आजपासून सुरू करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी आज पासून मंदिर उघडण्यासंदर्भात नियम,अटीनुसार मंदिर उघडण्यासंदर्भात पत्रक काढलं आहे.मात्र विदर्भातील सर्वात महत्वाचं समजलं जाणार कौडण्यापूर येथील रुख्मिनी मातेचं मंदिर अद्याप बंदच आहे. येथील तालुका प्रशासनाच्या नियोजनांतुन शनिवारला मंदिर उघडण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त कमिटीकडून देण्यात आली आहे.राज्यातील मंदिर उघडले असताना नेमकं रुख्मिनी मातेचं मंदिर बंद असल्यामुळे भाविकांचा हिरमोड होत असल्याच्या प्रतिक्रिया येणाऱ्या भाविकांनी यावेळी दिल्या,आरोग्याच्या दुष्टिकोनातून कौडण्यापूर मंदिर संस्थाचे वतीने विविध नियमा अंतर्गत दर्शनाची व्यवस्था करून उघडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे,त्यामुळे आणखी दोन दिवस भक्तांना रुक्मिणीच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे,पंढरपूर येथील आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्याना राज्य शासनाने परवानगी दिली होती त्यात १० पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी होय,कौडण्यापुरच रुक्मिणी मातेचं मंदिर बंद असल्याने लांब वरून येणाऱ्या भाविकांना आल्या पावली परत जावे लागत आहे..
बाईट - अतुल ठाकरे,विश्वस्त रुख्मिनी संस्थान.
बाईट - ज्ञानेश्वर उगळे, भाविक.
व्हिडीओ - प्रशिक मकेश्वर, तिवसा
#esakal #sakal #templereopen #maharashtra #vitthalmandir