Chhattisgarh CM Bhupesh Baghel | मुख्यमंत्री भूपेश बघेल एअरपोर्टवर बसले धरणे देत | Sakal Media

Sakal 2021-10-05

Views 1

Chhattisgarh CM Bhupesh Baghel | मुख्यमंत्री भूपेश बघेल एअरपोर्टवर बसले धरणे देत | Sakal Media
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये (lakhimpur kheri violence) झालेल्या नृशंस हिंसाचारात चार शेतकरी ठार झाले आहेत. या घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी (congress leader priyanka gandhi) गेल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ त्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणि आता शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात (FIR against priyanka gandhi) एसएचओ हरगाव पोलिस ठाण्यात (SHO Hargaon police station) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाल्यामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या दरम्यानच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल प्रियांका गांधींना भेटाया लखनऊला भेटायला निघाले असता, त्यांना एअरपोर्टवरच अडवण्यात आलं आहे. त्यानंतर भूपेश बघेल यांनी त्या ठिकाणीच जमिनीवर बसून धरणे आंदोलन सुरु केलं आहे. सीतापूर येथे प्रियांका गांधीजींना भेटण्यासाठी मी लखनौला आलो. पण मला विमानतळ सोडण्याची परवानगी दिली जात नाहीये, असं छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल म्हणाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS