माकणी (जि.उस्मानाबाद) : माकणी (ता.लोहारा) परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची स्वप्न पाण्याबरोबर वाहून गेली. नदी पात्र दुथडी भरुन वाहिले. अधिकचे पाणी नदी काठच्या शेतातून गेले. पिके पाण्यात गेली. यामुळे पाण्याबरोबर उत्पन्नाची आशा वाहून गेली. मोठा खर्च करुन हाती उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. (व्हिडिओ - सदाशिव जाधव, माकणी)
#ternariver #osmanabad #osmanabadrainuopdates #heavyrainfall #rainfall #ternariverosmanabad