गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे अतिवृष्टी झालेल्या भागांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरात लवकर पंचनामे करून आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
#JayantPatil #Flood #Beed #Maharashtra #Marathwada