Pune: पुण्यातील खवय्यांना बंगालचा स्वाद

Sakal 2021-09-28

Views 506

मंडळी ,पुणे हे जसं 'विद्वानांचे' शहर मानलं जातं तसंच 'खवय्यांच' शहर मानलं जातं कारण इथल्या प्रत्येक गल्लीत जर आपल्या बुद्धीने समोरच्याला आपली पातळी दाखवून देणारी लोकं असतील तर अगदी त्याच पॅशनने रविवारी सकाळी वैशाली किंवा रुपालीसमोर शिस्तीत रांगेत उभे राहून आपल्या आवडत्या पदार्थाची वाट बघत उभे असलेले लोकसुद्धा आपल्याला हमखास दिसतात, याच पुण्यात राहणार माणूस कधीच उपाशी मारू शकत नाही कारण इथल्या प्रत्येक मार्गावर आपल्यासाठी मेजवानी असते ,मग तो वडापाव असेल किंवा मिसळ असेल. याच पुणेकरांसाठी व महाराष्ट्रातील तमाम खवय्यांसाठी सकाळ घेऊन येतय एक असा चमचमीत शो कि जो उत्तम उत्तम रेस्टोरंट व तेथील खाद्यपदार्थांची माहिती देईल ज्याचं नाव आहे Foody Moody.
तर मंडळी या नवीन फूड सिरीज मध्ये आज आपण टॉप इन टाऊन ( स्पेशालिटी इन बंगाली फूड) या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत.जेवणा बद्दल पहिला तर लाच्छा पराठा,तंदुरी ,फिश,चिकन,मटन हे स्पेशल तर आहेच पण इतर गोष्टी सुद्धा छान आहेत .
इथे आल्यानंतर कोरोनाचे सगळे नियम पाळण्यात आले. अगोदर तापमान चेक करण्यात आले त्यानंतर Sanitization पण करण्यात आले
गरवारे ब्रिज , डेक्कन येथील उभ्या असणाऱ्या या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या.
#sakalmedia #foodie #bengalifood #maharashtra #mharashtrafood #streetfood #streetfoodindia #streetfoodmaharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS