Pune : मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाच्या तयारीत

Sakal 2021-09-25

Views 1

Pune : मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाच्या तयारीत

Pune : मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या पत्रात चुकीची माहिती, मुख्यमंत्र्यांना पुन्हा पाठवण्यात आलेल्या पत्राच्या उत्तराची वाट पाहतोय. मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या महत्वाच्या मागण्यासंदर्भात सरकारने त्वरित पावलं उचलावी अन्यथा आझाद मैदानावर मी उपोषण करण्यास तयार आहे अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात दिली.
पुण्यात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त संभाजीराजे आले होते त्यावेळी ते बोलत होते,
मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ट आहे त्याबाबत मी फारसे बोलणार नाही मात्र इतर मागण्यांबाबत सरकार उदासीन आहे, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींप्रमाणे काही सवलती या प्रमुख 5 मागण्यांची पूर्तता सरकारने करावी यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर ही दिलेमात्र त्यात सरकारी बाबूंनी उलट सुलट आणि चुकीची माहिती दिली आहे असा आरोप खासदरसंभाजीराजे यांनी केलाय, मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र पाठवले आहेत, तुलाही आता 15 ते 20 दिवस उलटून गेले आहेत अद्याप कोणतेही उत्तर आले नाही, अजून उत्तराची वाट पहात आहोत अन्यथा
समन्वयकाशी संपर्क साधून आंदोलनाची व्युव्ह रचना आखण्यात येईल असंही संभाजीराजे म्हणाले, आरोग्य विभागाच्या राज्य सरकारच्या परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर
आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत. याबत दिली सरकारने चांगले काम केले आहे. त्यांचा आदर्श आपणही घ्यायला हवा. विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये.

बाईट- संभाजीराजे, खासदार

#sambhajiraje #pune

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS