काम कुणाचं, नाचतंय कोण? राजे भिडले | Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale | Maharashtra

Lokmat 2021-09-24

Views 204

सातारा नगरपालिकेचा गड काबीज करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासकामांचा धडका सुरू केला असतानाच दोन्ही राजेंमध्ये सुरू असलेल्या ‘वाक्’युद्धाने साताऱ्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याची आणखी एक झलक बुधवारी सातारकरांना पाहायला मिळाली. पोवई नाक्यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांकडून एकाच कामाचे दोन फलक लावण्यात आले. हे फलक अन् कामावरून सुरू झालेला श्रेयवाद सातारकरांच्या चर्चेचा विषय ठरला. दोन्ही राजे भाजपवासी असले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्यांमधून लढणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी यंदाही पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केलीय. तर शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाची सल भरून काढण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. Ashwin vo
#Maharashtranews #UdayanrajeBhosale #ShivendrarajeBhosale #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS