अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर 'संजय दत्त' ची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत यापूर्वी सोशल मीडियामध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये तुम्ही असेल. अभिनेत्री मनीषा कोईराला संजय दत्तच्या आईची म्हणजेच 'नर्गिस दत्त'ची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियामध्ये 'नर्गिस दत्त'च्या भूमिकेतील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. मनीषाचे फोटो पाहता ती अगदीच हुबेहुब नर्गिस दत्तप्रमाणे दिसत आहे. राजकुमार हिरानी दिगदर्शित आणि विधू विनोद चोप्रा निर्मित हा चित्रपट २९ जून २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, मनीषा कोईराला सोबतच परेश रावलदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. परेश रावल संजय दत्तच्या वडिलांची म्हणजेच 'सुनील दत्त' यांची भूमिका साकरणार आहेत. संजय दत्तच्या या चित्रपटाचे नाव अजूनही जाहीर करण्यात आलेलले नाही
Manisha Koirala
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews