राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असे निर्देश देणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. यावरून भाजपा प्रवक्ते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देणं दुर्देवी आहे, असं ते म्हणाले आहेत.
#PravinDarekar #CMUddhavThackeray