राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिलाय. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असे अनंत गिते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
#AnantGeete #Shivsena #NCP #Congress #ThackerayGovernment