तामीळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता विजय याच्या ‘मर्सल’ चित्रपटात जीएसटी आणि डिजिटल इंडियावर भाष्य करणारं सीन सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. हा सीन ट्विट झाल्यानंतर अनेक जण रिट्विट करत आहेत. भाजपच्या टीकेनंतरही सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अभिनेता विजय हा मोदींविरोधी असल्यानेच त्याने ‘मर्सल’मध्ये जीएसटी, डिजिटल इंडियावर टीका केल्याचा आरोप भाजपने केला होता. सिनेमात एका सीनमध्ये हिंदुस्थान आणि सिंगापूर या दोन्ही देशांमधील वैद्यकीय सुविधा आणि करांबाबत भाष्य केले आहे. सिंगापूरमध्ये नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जाते आणि सात टक्के जीएसटी आकारला जातो. हिंदुस्थानात मोफत वैद्यकीय सेवा दिली जात नाही तरीही २८ टक्के जीएसटी नागरिकांकडून वसूल केला जातो. औषधांवर १२ टक्के जीएसटी लावला जातो. हिंदुस्थानात सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने लोकांचे मृत्यू होतात. डायलेसिसच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्याने मृत्यू होतात अशी वस्तुस्थिती विजयने या सिनेमातून मांडली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनीही सिनेमाची स्तुती केली आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews