कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत मिळणार असल्याचे मेसेज व्हायरल झालेयत... इतकंच काय तर अशा मदतीसाठीचे अर्जही व्हायरल झाल्याने मृतांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू झालीय... आपल्या घरातील व्यक्ती गेल्यामुळे दु:ख तर झालंय, पण तरीही मदत मिळतेय तर घेऊया असा विचार करत, अनेकजण शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालतायत... त्यामुळे तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अशा अर्जांचा खच पडलाय... कोरोना, लॉकडाऊनबाबतच्या नियोजनात प्रशासन असतानाच आता या अर्जांची मोठी डोकेदुखी प्रशासनाला सहन करावी लागतेय. कोरोनामुळे मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत देण्याचा कुठला ही निर्णय झालेला नसल्यामुळे या अर्जांना केराची टोपली दाखवली जातेय... याबाबत आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं असता, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
Navnath vo
#Coronavirus #Covid19 #Coviddeath #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat