शिवसेना आमदाराने रिक्षावाल्याला कानशिलात का लगावली?Ambadas Danve Beaten Riksha Driver | Aurangabad

Lokmat 2021-09-13

Views 149

रिक्षाचलकाला भररस्त्यात कानशिलात लगावणारे हे आहेत, शिवसेनेचे आमदार... नाव आहे, अंबादास दानवे... आता या आमदार महोयद्यांनी या रिक्षाचालकाला कानशिलात का लगावली? तर झालं असं,
सोमवारपासून दुपारी चारनंतर बाजारपेठ बंद होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या... नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली.... दुपारी अडीच ते पावणे तीनच्या सुमारास जालना रोडवर दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती... यामुळे वाहतूक मंदावली होती. क्रांतिचौकात वाहतूक शाखेच्या हवालदार सुजाता खरात आणि अन्य एक हवालदार वाहतूक नियमन करीत होते... मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहनचालक हॉर्न वाजवित होते.क्रांतिचौकाच्या चारही रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या... याचवेळी तिथून जाणारे आ. दानवे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेत ट्राफिक कंट्रोल सुरु केलं... याचवेळी एक रिक्षाचालक नियम मोडून सुसाट जाऊ लागला. तेव्हा दानवे आणि कार्यकर्त्यांनी रिक्षा रोखली. सर्व वाहनचालक सिग्नलवर उभे असताना तू असा कसा निघाला, असं विचारत त्यांनी थेट त्याच्या कानशिलात लगावली.... यावेळी त्याने काहीतरी कारण सांगितलं.... त्यानंतर यापुढे नियमभंग करू नको, असं बजावत त्याला जाऊ दिलं... या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना अंबादास दानवे यांनी म्हटलं, की मी आमदार म्हणून नाही शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरलो...

#lokmat #Aurangabad #AmbadasDanve #RikshaDriver
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS