गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा उपचाराभावी मृत्यू | Corona Virus Update | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 137

यवतमाळ येथील एमडी आयुर्वेदिक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
शेख मुश्ताक शेख खलील (४५) रा. पुष्पकुंज सोसायटी, वडगाव यवतमाळ असे या डॉक्टरचे नाव आहे. पुष्पकुंजमध्येच त्यांचे निवासस्थान व शिफा हॉस्पिटल आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता त्यांना हृदयाघात झाला. घाबरल्या सारखे वाटल्याने त्यांनी आपला मदतनीस राम शिरस्कर याला बोलविले व मुलाला सोबत घेऊन दुचाकी वाहनाने ते तिघे जण जवळच असलेल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. परंतु तेथे प्रवेशद्वारावरच आम्ही सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण घेत नाही, असे सांगण्यात आले. आपण डॉक्टर आहोत असे शेख यांनी सांगितल्यानंतर एक परिचारिका आली, मात्र तिनेही तेच कारण सांगितले. त्यामुळे डॉक्टर शेख तेथून येथीलच डॉ. महेश शाह यांच्या शाह हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर सेंटरमध्ये पोहोचले. तेथे दार उघडले गेले नाही, तेथे एक म्हातारा गृहस्थ उपस्थित होता. यावेळी डॉ. शेख यांनी डॉ. शाह यांना स्वत: मोबाईलवर कॉल केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तेथेच डॉ. शेख कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित केले गेले.
#CoronaVirus #Covid19 #Coronaupdates
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS